सामान्य नागरिकांसोबत युवाशक्ती ची तीव्र नाराजी
भाजपा शहर प्रमुख कसे रोखणार हे वादळ
असंख्य नगरसेवक भाजपा ची उमेदवारी नाकारून अपक्ष लढण्याचे तयारीत
अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील नगरपालिका निवडणूकीचा बिगूल वाजला व सर्व राजकीय पक्षांनी आपले नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे
उमेदवाराची विशेषतः नगराध्यक्ष पदाकरीता पक्षाने घोषणा केल्या मुळे भाजपा मधे मोठी असंतोषाची लाट
दिसायला लागली आहे व ही धुमसत असलेली आग आता
वणवा बनलेली आहे.त्यामुळे नगरसेवक म्हणून भाजपचे अधिकृत उमेदवार सुध्दा अपक्ष निवडणूकीत आता लढण्यास इच्छुक असल्याचे बोलल्या जात आहे.
केंद्रात व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून सर्वत्र
भाजपच्या पक्ष बांधनीला जोर चढला.असंख्य तरूण मंडळी पक्षात प्रविष्ट झाले.या कार्यात अचलपूर शहरातील
अभय माथने यांनी महत्त्वाची भूमिका बजावत अनेक युवकांना पक्षात जोडले.नगरपालिका निवडणूकीत अशा कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातून पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले तसेच नगराध्यक्ष सरळ जनतेतून निवडणूकीत निवडल्या जाणार असल्याने अोबीसी महिला करिता आरक्षित जागेवर रूपालीताई अभय माथने
यांनी भाजपा कडे उमेदवारी मागितली वेळेपर्यंत त्यांना तसे आश्वासन सुध्दा देण्यात आले त्यांचे पती असणारे अभय माथनेे भाजपचे अचलपूर विधानसभा संपर्क प्रमुख असून उमेदवारी नामांकण भरण्याचे अंतीम दिवशी शेवटच्या घटकेला ही उमेदवारी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष रूपेश ढेपे यांच्या पत्नी सिमाताई यांना घोषित झाल्याने आज पर्यंत एकवटलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे.अचलपूर शहरातील काही युवा उमेदवार ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली ते सुध्दा अपक्ष निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तसेच बरेच नगरसेवक नगराध्यक्ष म्हणुन अभय माथने यांचे सोबत आहेत असे चित्र स्पष्ट होत आहे यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपा मय दिसणारी स्थिती सध्या पुसटशी विरोधात जात असल्याचे दिसून येते आहे.मतदारांचा सुध्दा कल काहीसा असाच दिसत आहे.असे जर झाले तर
नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत काय निकाल येईल हे
सध्यातरी संभ्रमित करणारे राहील असा अंदाज बांधला जात आहे.अचलपूर नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असून राज्यात या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष वेधले असतांना वेळेवर निर्माण झालेल्या अशा बिकट परिस्थितीत पक्षात धुमसत असल्याल्या विरोधाच्या वणव्याला रोखण्यासाठी शहर,तालुका व जिल्हा अध्यक्ष यांची शक्ती पणाला लागणार आहे व शहर अध्यक्ष हा तिढा कसे सोडतात व पक्षात निर्माण झालेली ही परिस्थिती सावरून भाजपा पक्षश्रेष्ठींना *आँलईज वेल* कसे दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उमेदवारी दाखल केलेल्या चौदा उमेदवारापैकी एक अधिकृत व पाच इच्छुक असे सहा भाजपचे उमेदवार आहेत त्यापैकी अधिकृत व तीन इतर अश्या चार उमेदवारांनी नामांकन अर्जात भाजपा पक्ष नमुद केले असून त्यांनी वेगळे अपक्ष
उमेदवारी अर्ज सुध्दा भरले आहेत हा सुध्दा मुद्दा येथे गांभीर्याने घ्यावा लागेल.बाकी पक्ष श्रेष्ठी,उमेदवार व मतदार काय करतात हे तर निवडणूक निकालानंतरच माहित होईल.अभय माथने यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे इतर उमेदवार अर्ज मागे घेतात की बंडखोरी करतात तसेच अर्ज मागे घेवून पक्षासोबत राहतात की वेगळी भूमिका बजावतात हे
११ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचे प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.
Post a Comment