जळगाव-
- पिंपळेसीम येथील ह.भ.प. गोपाल महाराज देवचंद महाले यांना फौजदार तुकाराम साबळे यांनी मारहाण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कारागृहात टाकण्याची धमकी दिली आहे. (असे गुंड मनोवृत्तीचे पोलीस फौजदार कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? - संपादक) या संदर्भात ह.भ.प. गोपाल महाराजांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
जळगाव येथील नवीन बसस्थानक परिसरात हा प्रकार घडला. या वेळी पोलीस साध्या गणवेशात असल्याने बघ्यांच्या ते लक्षात आले नाही. धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम येथील ह.भ.प. गोपाल महाराज यांच्या घराच्या वादात त्यांच्या भाऊबंदकीतून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. फौजदार साबळे यांनी महाराजांची बाजू ऐकून न घेता त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे या संदर्भात ह.भ.प. गोपाल महाराज यांनी मानवी तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून आयोगाने फौजदारांना फटकारले होते. या गोष्टीचा राग येऊन फौजदारांनी महाराजांना मारहाण केली.

Post a Comment