मोईन खान/परभणी /-:
तालुक्यातील सोनपेठ येथे कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी माधव ताल्डे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल व प्रा. डॉ. पाटील एम. बी व प्रा. डॉ. कच्छवे एम.डी. यांना संशोधन मार्गदर्शक तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख के.एम. गोलेकर यांना पी.एच्.डी. प्रदान झाल्याबद्दल व प्रा. डॉ. एम. जी. सुर्यवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालय, व हशिप्र संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धा परिक्षेमार्फत माधव ताल्डे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून महाविद्यालयाच्या करिअर अँड कौन्सिलिंग सेल मार्फत सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयातून मिळालेल्या शिक्षणामधूनच मी या परिक्षेत यश मिळवले हे त्यांनी मनोगतात सांगितले तसेच महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. बी.पाटील व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.डी. कच्छवे यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून स्वा. रा. ती. विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचा तसेच न्यायालयीन सक्रियता या विषयावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के. एम.गोलेकर यांना डॉ.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एच्. डी. प्रदान करण्यात आली. त्याबद्दल व पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्या बद्दल या सर्वांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुत्रसंचालन प्रा. सखाराम कदम, प्रास्ताविक प्रा.डॉ. संतोष रणखांब तर आभार प्रा. डॉ. बी.एम.काळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment