![]() |
भाजप-सेना नगरसेवकांच्या बैठकीत विषय मांडतांना समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट |
सोलापूर - येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणार्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी येथील भाजप-शिवसेना भवनामध्ये ३० नोव्हेंबर या दिवशी बैठक घेण्यात आली. बैठकीत भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या नगरसेवकांनी धर्मसभेला कार्यकर्त्यांसह अधिक संख्येने उपस्थित रहाण्याचा निर्धार केला. बैठकीला १५ नगरसेवक, गटनेता, पदाधिकारी यांसह ४० मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी राष्ट्र-धर्माची सद्यस्थिती आणि धर्मसभेची आवश्यकता हा विषय मांडून धर्मसभेला अधिकाधिक संख्येत येण्याचे आवाहन केले.
Post a Comment