पुणे /-
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर परिसरात आज सकाळी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत कारचालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अनिल मधुकर बंडगर (वय 50 वर्ष ) , नीलम अनिल बंडगर (वय 45 वर्ष रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
अनिल मधुकर बंडगर (वय 50 वर्ष ) , नीलम अनिल बंडगर (वय 45 वर्ष रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
Post a Comment