अचलपूर / -
तालुका विज्ञान प्रदर्शन सिताराम गणोरकर विद्यालय पथ्रोट येथे संपन्न झाली यामध्ये तालुक्याच्या सर्वच शाळेने सहभाग घेतला होता.
या प्रदर्शनात स्थानीक राष्ट्रीय विद्यालय येथून चार प्रतिकृती सह सोळा विद्यार्थ्यांनी प्रभारी शिक्षक अजीत कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला यामध्ये घरी विद्युत निर्मिती प्रकल्प सादर केला.मँग्नेट व काँईल पासून एवढी विद्युत निर्माण होऊ शकते की सायकलच्या एका पायडलमधे दहा खोल्या प्रकाशमय होतात.या ऊपकरणाचा उपयोग कुणीही करू शकते केवळ पायडल मारा व कित्येक तास विद्युतमय करुन टाका.असे प्रतिकृती सादर करणा-या अनिकेत हजारे,प्रतीक महाजन,ओम डाफे व स्वप्नील हांडे यांनी सांगितले.प्रोडक्शन आँफ ईलेक्ट्रीकसीटी अँट होम या राष्ट्रीय हायस्कूल च्या प्रतिकृतीला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल पब्लिक वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष संजयकुमार चौधरी ,सचिव अनिलकुमार चौधरी, मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले,पर्यवेक्षक सुनिल झंवर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment