यवतमाळ :-
स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झालं. शनिवारी पहाटे पाच वाजता यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयात धोटे यांची प्राणज्योत मालवली.
जांबुवंतराव धोटे काँग्रेसतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा, तर लोकसभेवर दोनवेळा निवडून आले होते. धोटे यांनी विधानसभा आणि लोकसभेत विदर्भाचा आवाज बुलंद केला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले.
Vidharbhacha lion went
ReplyDelete