वाशिम - महेन्द्र महाजन /--
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालीका व नगरपालीका निवडणूकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या नेतृत्वात भाजपाने सर्वत्र घवघवीत यश संपादन करुन महाराष्ट्रात भाजपा नंबर एक वर राहीला आहे. भाजपाच्या या यशाचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या वाशीम शहर व तालुका शाखेकडून पारंपारीक पध्दतीने वाद्य वाजवुन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकार्यांनी स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पारंपारीक पध्दतीने वाद्य वाजवून, फटाके वाजून व फोडून भाजपाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवामध्ये आमदार लखन मलीक, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, संदीप पिंपरकर, भाजपा तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, भिमसेठ जिवनाणी, वसंतराव धाडवे, मिठुलाल शर्मा, प्रभाकर पद्मणे, न.प. उपाध्यक्ष बंटी वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, नगरसेवक बाळू मुरकुटे, करुणाताई कल्ले, गुरनामसिंह गुलाटी, गौतम भालेराव, डॉ. विवेक माने, गौतम सोनोने, गजानन खटके, नारायण वानखेडे, जीवन अग्रवाल, सुरज चौधरी, उत्तम पोटङ्गोडे, रामभाऊ देव, विनय लंगर, सौ. मालतीबाई गायकवाड, वत्सलाबाई जाधव, सौ. नकले, दत्ता सुरदुसे, शिवशंकर भोयर, वामनराव अंभोरे, राजु जोगी, अनिल ताजणे, सचिन शर्मा, बबनराव राऊत, कैलास मुगवानकर, रामकुमार मानधणे, गणेश खंडाळकर, विनायक जवळकर, संजय केकन, राजु कल्याणकर, पंकज इंगोेले, हनुमान शिंदे, आनंद गडेकर, आशुतोष निरखी, जयंतीलाल भिमजीयाणी, कपिल सारडा, पवन जोगदंड, शिवा गायकवाड, गजानन घुले, संदीप जोशी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Post a Comment