BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

वडाळी परिहार पुरा ,राजुरा पारधी बेडा ,दिवानखेड भागातून अवैध गावठी देशी दारू धंद्यावर धाडी

अमरावती / विशेष प्रतिनिधी -

सध्या सगळीकडे म्हणजेच महानगरपालिका- जिल्हापरिषद  निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर तैनात करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथकाने आज राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत समन्वय साधत तालुक्यातील कुर्‍हा जकात नाक्याच्या परिसरातील डाळी परिहार पुरा ,राजुरा पारधी बेडा ,दिवानखेड , मार्डी व शिदवाडी या  परिसरातून  अवैध दारू अड्डय़ावर धाडटाकत केलेल्या कारवाईत गावठी दारू गाळणी , यामध्ये गावठी दारू ११० लिटर , मोहा रसायन २८०० लिटर  साहित्यासह एक तीन चाकी ऑटो रिक्षा 
असा एकूण १३५०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणामध्ये एकूण ३ गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात सुरेश डोमाजी कोहाड वय ६५ वर्ष रा देऊरवाडा , कमलाबाई केसरी नायकवाड  वाय ५० वर्ष राहणार परिहार पुरा . तसेच पुनियाबाई मुलचंद नायकवाड  रा - परिहार पुरा या प्रकरणात यांना अटक करणायत आली आहे  


सदर कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री एस.एस. लांडगे व त्यांचे कर्मचारी, श्री एस वाय श्रीवास्तव ,दुय्यम निरीक्षक श्री बेदरकर , श्री अजमिरे , मावळे , गभने , रंदये ,व सहायक दुय्यम निरीक्षक श्री राऊतकर व जवान अंकुश काळे , मोकळकर  तसेच महिला कर्मचारी श्रीमती खैरकर , भारसाकळे ,हटवार   यांनी केली 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.