वाशिम / महेंद्र महाजन /--
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी पासून 3 किलोमीटर अंतरावर जंगल भागात पहाडावर जमालबाबा चे जागृत देवस्थान असून येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शना येतात आणि नवस बोलतात. देवस्थान गँगलवाडी लगत असूनही त्याला मारसुळ येथील जमाल बाबाचे देवस्थान म्हणून ओळखले जाते . महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शनासाठी एकच गर्दी करतात .याच दिवशी येथे भव्य महाप्रसादाचा वाटप करण्यात येतो . वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील जमालबाबा व पहाडाची कपार म्हणून याचा नावलौकीक आहे. दोन दशकांपूर्वी गांगलवाडी गावापासून 3 किलो मीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात पहाडावर पांढऱ्या धोड्यावर स्वार होत एक योगी पुरुष अवतरले .. हिंस्र पशु योगीपुरुषाच्या जवळ खेळत असल्याची अख्यायिता आहे .मोरणा नदिवर पहाडी भाग असून मोठमोठे पहाड येथे पाहायला मिळतात. याच पहाडाला पडलेल्या एका कपारीत जमालबाबा शरीराचा आकार लहान करून विश्रांती घेत असत . विश्रांती झाल्यावर बाबा कपारी बाहेर येऊन पूर्ववत शरीराचा आकार धारण करून पहाडावर येऊन बसत.असल्याची कथा आहे . जमालबाबानी भक्तांना अनेक चमत्कार दाखविल्याने येथे हिंदू मुस्लिम भक्त घनदाट जंगलात बाबांच्या दर्शनाला येत असत .हिंस्त्र पशु भक्तांना कसल्याही प्रकारची इजा करत नसत . बाबांनी पहाडाच्या कपारीत समाधी घेण्याची घोषणा करून गावकार्यासमोर दोन दशकांपूर्वी समाधी घेतली असल्याचे भाविक सांगतात मारसुळ येथील राजबा घुग यांनी जमालबाबाची सेवा केली त्यांची समाधी पहाडावर बांधण्यात आली 70 ते 80 वर्षांपूर्वी पातूर येथील गाडगीळ कुटुंब बाबाच्या दर्शनाला आले असता पांडुरंग नावाचा त्यांचा 8 वर्षांचा मुलगा जमालबाबानी समाधी घेतलेल्या पहाडाच्या कपारीत गेला तेव्हा पासून तो परत आलाच नाही . पहाडात मोठे भुयार असल्याचे भावीक भक्त सांगतात. याच ठिकाणी समाधी स्थळावर लहानसे मंदिर उभारण्यात येऊन पांडुरंग यांची मूर्ती उभारण्यात आली .हिंदू बांधव बाबाला जंगली बाबा म्हणत तर मुस्लिम बांधव जमालबाबा म्हणत कालांतराने बाबाला जमालबाबा म्हणूनच ओळखले जाऊ लागले . मारसुळ येथील एका भक्ताने नवस कबुल केला त्याची पूर्तता झाली बाबाने त्याच्या स्वप्नात जाऊन पहाडावर सात कळस उभारणाचे सांगितले भक्ताने बाबाचे स्वप्न काही भक्ताना सांगाताच भक्तांनी 70 ते 80 फूट खोल मोरणा नदीतून रेती पहाडावर चढविली. तेथे जमालबाबा याची शुभ्र पांढऱ्या घोडयावर स्वार मूर्ती बसविण्यात आली त्याच बाजूला दत्तत्रय,विठ्ठल रुख्मिणी, महादेव,गणपती, हनुमान ,मुंगासीजी महाराज असे 7 मंदिर उभारण्यात आले आठवे श्रीकुष्णा चे मोठे प्रवेश द्वार उभारले जाणार आहे . येथील वातावरण निसर्गरम्य असून येथील भाग वनविभागाच्या ताब्यात असल्याने मूलभूत सुखसुवेधे पासून वंचित आहे .या भागात जिल्ह्या परिषद सदस्यां रत्नप्रभाबाई घुगे यांचा दरारा असूनही वनविभागामुळे त्यांना काही करता येत नाही आमदार खासदार,मंत्र्यानी या बाबी कडे लक्ष देऊन येथील विकास करावा अशी बावीकभक्तांनी मागणी केली महाशिव रात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे पंक्रोशीतील भावीकभक्त दर्याखोर्यातून नदीपार करत उंच पहाडावर दर्शनाला येतात पहाडात जमालबाबानी समाधी घेतली त्या ठिकाणी लहानथोर, वयोवृद्ध. बाल गोपाल चढत दर्शनला येतात . समाधीस्थळावर पूजाअर्चा करतात .यावर्षीही महाशिव रात्री च्या दुसऱ्या दिवशी दि 25 फेब्रुवारीला जमालबाबा देवस्थानात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारो हिंदू मूस्लीम भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला
Post a Comment