BREAKING NEWS

Saturday, February 25, 2017

चोपडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

चोपडा (जिल्हा जळगाव) – येथील तहसील कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या


१. मद्य-मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करून कारवाईही करावी.
२. हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस उपाय करून कालमर्यादा घालून कृती करावी.
३. केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्‍या हिंदु नेत्याच्या हत्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात यावा.
४. संसदेत गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडणार्‍या होणारी आर्थिक हानी खासदारांच्या वेतनातून वसूल करावी.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.