चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वेतील रेल्वे रूळावरील अपलाईनवर पोल क्रमांक ६९२ जवळ ३०-३५ वयोगटातील अज्ञात इसम मृत अवस्थेत आढळुन आल्यामुळे पोलीस या मृत इसमाच़्या नातेवाईकाचा शोध घेत आहे.
सविस्तर वृत्तानुसार चांदुर रेल्वे च्या अपलाईनवर नुकताच ३०-३५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळुन आला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाची उंची ५ फुट ६ इंच, रंग सावळा, मजबुत बांधा, डोक्याचे केस काळे, गोल चेहरा, जाड मिशी, अंगात पांढऱ्या रंगाचे काळी लाईनींग असलेले टी- शर्ट, पांढऱ्या रंगाचे बनियन, पायात निळ्य रंगाचे रबरी चप्पल, हिरवे- पांढरे ठिपके असलेला बरमुडा, लाल रंगाची जैन लिहलेली अंडरविअर अंगावर आहे. तरी अशा वर्णणाचा इसम माहित असल्यास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन ठाणेदार, चांदुर रेल्वे यांनी केले आहे.
Monday, February 20, 2017
३५ वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यु ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे आवाहन
Posted by vidarbha on 4:20:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment