तुम्ही फक्त तुम्हाला दिलेला मार विसरू नका - माझे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील, बाकीचं मी बघतो -- श्री राजसाहेब ठाकरे
Posted by
vidarbha
on
2:24:00 PM
in
|
महाराष्ट्रात रेल्वेमध्ये अप्रेंटीस म्हणून काम करणारे १५०० मराठी मुलं-मुली उमेदवार नोकरीसंदर्भात दिल्ली येथे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेण्यासाठी गेले असता, दिल्ली पोलिसांनी त्यांना लाठीचार्ज करुन अमानुषपणे मारहाण केली. यासंदर्भात महाराष्ट्रातील एकाही पक्षाने किंव्हा त्यांच्या नेत्याने या मुलांच्या बाजूने आवाज उठवला नाही. मा.राजसाहेबांनी कालच्या त्यांच्या भाषणात ह्या १५०० अप्रेंटीस मराठी मुला-मुलींना झालेल्या मारहाणीबद्दल आवाज उठवला.त्या अनुषंगाने हे सर्व अप्रेंटीस मुलं-मुली आज २/२/२०१७ रोजी सकाळी ११.०० वा.कृष्णकुंज, शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली .
Post a Comment