चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
आलेल्या जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेत चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील
श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले.
विद्यालयीन गट (ब) वर्ग ५ ते ७ मध्ये श्रीकृष्ण हायस्कूलचे वर्ग ७ वीच्या नारायनी श्रीधर बकाले
हिने जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकविले. तर शैलेश वीरेंद्र बकाले व आरती विनोद बाभुळकर
यांनी अनुक्रमे जिल्ह्यातून व्दितीय व तृतीय क्रमांक पटकविला. तसेच माध्यमिक गट (अ) वर्ग
८ ते १० मधून वर्ग दहावीचा पियुष नरेंद्र भोगे यांने जिल्ह्यातून व्दितीय आणि प्रतिक्षा यादवराव
नारनवरे हिने तृतीय क्रमांक पटकविला. या सर्व विद्याथ्र्यांना प्रजासत्ताक दिनी चांदूर रेल्वे
वनपरिश्रेत्र अधिकारी अनंत गावंडे, संस्था सचिव मधुकर नेरकर, प्राचार्य सुरेश देवळे यांच्या
हस्ते प्रमाणपत्र व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी चांदूर रेल्वे वनविभागाचे
वनपाल ओ.पी.चोरपगार, वनरक्षक शेख इकबाल, ए.न.डोंगरे, भारती शेंडे,सोनाली फड,
कल्याणी रेखे, क्लार्क अनिल माहुलकर, वनमजुर धनराज गवई, संजय पंचभाई आदींची
उपस्थिती होती.

Post a Comment