१० व ११ फेब्रुवारीला भव्य यात्रा
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
आमला विश्वेश्वर येथील विदेहीमुर्ती श्री संत एकनाथ महाराज जयंती महोत्सव ३ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले असुन १० व ११ फेब्रुवारीला दोन दिवस भव्य यात्रा भरणार आहे.
संत एकनाथ महाराज जयंती महोत्सवानिमित्त आमला विश्वेश्वर येथे ८ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम तसेच नाटक व कुस्ती दंगलची रेलचेल राहणार आहे.
३ ते १० फेब्रुवारी दरम्यान श्रीमद् भागवत सप्ताह,रोज पहाटे ५ वा.सामुहिक ध्यान, काकडा आरती, किर्तन, भजन, हरिपाठ व सामुदायिक प्रार्थना, खंजेरी भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतील.३ फेब्रुवारीला सकाळी ८ वा.श्री संत एकनाथ महाराजांची मुर्तीपुजा व तिर्थ स्थापना. सकाळी १२ वा. कमलाबाई कळमकर व श्रीराम महिला भजन मंडळ, आमला यांचे भजनाचा कार्यक्रम. सायं.६ वा.विनोद कावलकर यांचे सामुदायिक प्रार्थना व भाषण, रात्री ८ वा.हभप विलास साबळे यांचे किर्तन, ४ फेब्रुवारीला दु.१२ वा.नंदाताई सुभाष बाभुळकर व श्री संत एकनाथ महाराज महिला मंडळ, आमला विश्वेश्वर यांचे भजन, सायं.७ वा.हभप मधुकर तायडे व आखरे गुरूजी यांचे सामुदायिक प्रार्थना व भाषण, रात्री ८ वा.हभप ईश्वरदास महाराज लिखार यांचे किर्तन, ५ फेब्रुवारीला दु.१२ वा.सरस्वतीबाई पाल व चंदनशेष भजनी महिला मंडळ यांचे भजन, सायं.७ वा.रामदास डहाके व हभप प्रेमानंद क्षिरसागर यांचे किर्तन.६ फेब्रुवारी ला दु.२ वा.श्री संत एकनाथ महाराज महिला मंडळाचे भजन, सायं.७ वा. हभप महल्ले महाराज यांचे सामुदायिक प्रार्थना व भाषण व रात्री किर्तन.७ फेब्रुवारी दु.१२ वा.संत हरिदास महाराज यांचे भजन, सायं.७ वा.हभप आखरे गुरूजीचे सामुदायिक प्रार्थना व भाषण, रात्री ८ वा.हभप तात्या महाराज पिंपळे यांचे किर्तन. ८ फेब्रुवारी ला दु.१२ वा.आढावबाई व हनुमान महिला भजन मंडळाचे भजन, सायं.७ वा.सारंग वाढोणकर यांचे सामुदायिक प्रार्थना व भाषण,रात्री हभप जगन्नाथ महाराज उबाळे यांचे किर्तन.९ पेâब्रुवारी ला सकाळी ११ वा. वंदना व विठोबा देव्हारे(मुंबई) यांचे हस्ते चांदीच्या पादूकांचे पुजन, दुपारी १२ वा.श्री संत एकनाथ महाराजाच्या फोटोची व चांदीच्या पादुकांची रथातुन मिरवणूक विश्वेश्वर मंदिर येथून निघणार, सायं.७ वा.हभप तिरथकर यांचे सामुदायिक प्रार्थना व भाषण.१० फेब्रुवारी ला सकाळी ५ वा.सुरेंद्र बकाले यांचे सामुदायिक ध्यान व भाषण दु.१ वा. हभप महादेव माहुरे महाराज यांचे काल्याचे किर्तन आणि स्पर्धा परीक्षेतून उच्चपदावर पोहचलेले जे.जे हास्पीटल,मुंबईचे एमबीबीएस.एमडी डॉ.गणेश बाबाराव बनसोड, सहा पोलीस निरीक्षक शुभांगी लक्ष्मण आगासे, पिएसआय कपिल उत्तम खेकडे असि.इंजिनिअर गौरव अशोक डोंगरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायं.४ वा.महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला श्री संत एकनाथ मंदिर, वाढोणा येथे महाप्रसाद व गोपाळ काला आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमाचे भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र डेरे, उपाध्यक्ष लक्ष्मण हनोते व सचिव दादाराव डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment