![]() |
| शाळेवर शिकवितांना अधिव्याख्याता रत्नमाला खड़के |
शिक्षणमंत्री विनोद तावड़े व शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या ध्येयपूर्ति कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा प्रगत करण्याच्या अंतिम उदिष्टापर्यंत तालुका पोहचला असून येत्या 31 मार्च रोजी शासनाच्या निकषानुसार संपूर्ण तालुका प्रगत म्हणून घोषित होणार असल्याचा दावा स्थानिक शिक्षण विभागाने केला आहे. विशेष म्हणजे तालुक्याला विदर्भातील हा पाहिला शैक्षणिक प्रगत तालुका म्हणून बहुमान मिळु शकतो.
![]() |
| तालुक्यातील शिक्षकांचा आढावा घेतांना डायट प्राचार्य श्री अंबेकर |
सविस्तर माहिती नुसार 22 जून 2015 च्या शासन परिपत्रानुसार संपूर्ण राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने काम सुरु झाले होते. प्रत्येक मूल शिकु शकतो, ज्ञानरचनावाद, मेंदुचा अभ्यास, शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम, शाळासिद्धि, भाषा व गणित विषयाचे प्रशिक्षण, प्रगत कुमठे बिट ला भेटी, शैक्षणिक परिषद, शैक्षणिक साहित्य इत्यादी अनेक उपक्रमाने शिक्षण विभाग गेल्या 2 वर्षा पासून झपाटुन गेल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील संपूर्ण शाळा ह्या ज्ञानरचनावादी पद्धतीने रंगविन्यात आल्या. शाळेच्या संपूर्ण भिंती बोलक्या करुण मूल जातील तिथे त्यांना एक नवा अनुभव शाळेतील शिक्षकांकड़ून मिळू लागले आहे. शाळा प्रगत करण्याच्या 25 निकषानुसार शाळा व शालेय परिसरात झपाट्याने बदल जाणवत आहे. या सोबतच राज्यातील तीसरा शालाबाह्य विद्यार्थी विरहित तालुका म्हणून या अगोदरच तालुका घोषित झाला आहे, तसेच 100 टक्के शाळांमधे हैण्डवॉश स्टेशन, तंबाखू मुक्त शाळा, इत्यादि उपक्रमात् ही तालुक्यातील शाळा अग्रेसर आहे. माझी समृद्ध शाळा म्हणून असलेला शाळा शिद्धिसाठी तालुक्यातील सोनगाव शाळा एक आदर्श शाळा म्हणून पुढे आली आहे. तालुक्यातील या सर्व शाळांमधे लोकसहभाग ही भरपूर मिळत आहे, तालुक्याला सतत तिन वर्षापासून 100% मुलींची पट नोंदणी पुरस्कार प्राप्त होत आहे. शाळांची प्रगती पाहून अनेक ठिकाणी ग्राम पंचायत व लोकवर्गनितुन इतर भौतिक सुविधा शाळांना मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील दोन केंद्र स्पोकन इंग्लिशसाठी तैयार होत आहे. तालुक्यातील अर्ध्याधिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहे. या सर्व बाबींसह गुणावत्तेत तालुका कुठेच् मागे नसून तालुक्यातील धनोडी, शिरजगाव कोरडे, राजुरा, व कवठा कड़ू हे चार केंद्र संपूर्ण प्रगत घोषित झाले असल्याचेही शिक्षण विभागाने जाहिर केले आहे तर इतर 2 केंद्रातील केवळ 2 शाळा प्रगतच्या अंतिम उदिष्टपर्यंत पोहचायच्या असल्याने सोबत खाजगी शाळा व तालुक्याची क्रॉस चेकिंग केल्यानंतर मार्च अखेर संपूर्ण तालुका प्रगत घोषित होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी सांगितले आहे.
![]() |
| अप्रगत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्याच्या आधारे मार्गदर्शन करतांना साधन व्यक्ति |
प्रभारी व करार कर्मचारी यांची कामगिरी
चांदूर रेल्वे तालुक्यात गेल्या 3 वर्षापासून गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, यांचे पदे रिक्त असून विस्तार अधिकारी अशोक इंगळे, प्रभारी केंद्र प्रमुख व करार पद्धतीने असलेले विषय साधन व्यक्ति यांनी प्राचार्य रविन्द्र अंबेकर, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाड़े, विद्या प्राधिकरण (डायट)च्या जेष्ठ अधिव्याख्याता रत्नमाला खड़के यांच्या प्रेरनेतुन तालुका प्रगत करण्याचे उदिष्ट साध्य करीत आहे.
------------------------------ ------
शासन उदिष्टा नुसार तालुक्याची प्रगती
- 38 पैकी 38 प्राथमिक शाळा प्रगत
- 29 पैकी 27 उच्च प्राथमिक शाळा प्रगत
- माध्यमिक 26 पैकी 16 शाळा प्रगत
- शाळाबाह्य विद्यार्थिवीरहित तालुका
- १००% शाळेत हैण्डवॉश स्टेशन
------------------------------ ------



Post a Comment