रिसोड/रुपेश बाजड-
बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंती निमित्त रिसोड शहरातील बस स्थानक मध्ये अतिशय घाण झाली होती त्याची आपल्या सकाळ ला बातमी सुद्धा प्रकाशित झाली होती शिव जयंती निमित्याने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ए एन बी अकॅडमी कृषी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड येथील बस स्थानक साफसफाई करण्यात आली प्रसंगी श्री शिवाजी विद्यालय रिसोड नगर परिषद रिसोड आणि ए एन बी अकॅडमी रिसोड बस स्थानक चे आहिरे यांनी या साफसफाई ला मदत केली साफसफाई करता वेळेस नगर परिषद रिसोड चे मुख्याधिकारी पान झाडे नगर अध्यक्ष यशवंत देशमुख मराठा सेवा संघ अरुण झुंगरे धनंजय देशमुख विजय बोरकर मराठा सेवा संघ ता अध्यक्ष सचिन देशमुख संभाजी ब्रिगेड विनोद पाटील अर्जुन पाटील रमेश पाटील रिसोड आणि ए एन बी अकॅडमी चे बोनडे सर,अरुण मगर अलंकार खैरे रवी अंभोरे शेख अन्सार सुरेश गिरी कृषी परिषद चे अध्यक्ष रुपेश पाटील व शेकडो शिव भक्त हजर होते
Post a Comment