BREAKING NEWS

Saturday, February 25, 2017

पुसदमध्ये २६ फेब्रुवारीला होणाऱ्यां हिंदु धर्मजागृती सभेला सहस्रो संख्येने उपस्थित रहा !

पुसद (जिल्हा यवतमाळ) – 

हिंदु जनजागृती समितीचे पुसदकरांना आवाहन


येथील अग्रवाल मंगल कार्यालयाच्या समोरील पटांगणात सायंकाळी ६ वाजता २६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, त्याला सहस्रो संख्येने उपस्थित रहा, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सनातनचे पू. नंदकुमार जाधव, पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. सूरज डुबेवार, नगरपरिषद विरोधी पक्ष नेता श्री. निखील चिद्दरवार, भाजपचे तालुका सरचिटणीस श्री. रवि ग्यानचंदानी, रणरागिणीच्या कु. माधवी चोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते.
‘सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला असून शहर, तसेच ग्रामीण भागात बैठका घेण्यात आल्या आहेत. सभेच्या प्रचारासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, ज्ञाती संघटना, संप्रदाय, धर्मप्रेमी आपले जात-पक्ष भेद विसरून धर्मासाठी एकत्र आले असून त्यांनी या सभेला पाठिंबा दिला आहे. सभेमध्ये श्रीराम युवा सेनेचे आणि भाग्यनगर येथील आमदार प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर, सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या जळगाव जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे सभेला वक्ते म्हणून लाभले आहेत’, असेही या वेळी सांगण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.