मुंबई -
रात्रीच्यावेळी रेल्वेतून प्रवास करत असताना झोपलेल्या तुम्हाला अनेकदा तिकीट विचारण्यासाठी टीसी वारंवार उठवतात. मात्र ही तक्रार लक्षात घेऊन रेल्वेने एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार रात्री १० ते पहाटे ६ वेळात टीसी तुम्हाला वारंवार उठवणार नाही, कोणत्या टीसीने तुम्हाला वारंवार उठवल्यास तुम्हाला तक्रार करता येईल.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना तिकीट तपासून झाल्यानंतर देखील अनेकदा टीसी तुमच्याकडे वारंवार तिकीट मागून तुमची झोपमोड करायचे. एकदा तिकीट तपासून झालेले असताना वारंवार तिकीट तपासणे चुकीचे आहे. टीसी बदलल्यानंतर पुन्हा तपासणी व्हायची अशा तक्रारी रेल्वेमत्र्यांकडे वारंवार करण्यात येत होत्या. खरेतर २०१० मध्ये तसे आदेश काढण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. रेल्वेने २७ जानेवारी रोजीच आदेश मंजूर घेतले आहेत. ३ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, कारण तसे हे आदेश रेल्वेच्या सर्व विभागाला देण्यात आले आहेत आणि तसे करण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment