जुळ्या शहरात शेकडो अँटो,ट्रक्टर व ट्रक चालतात.त्यामुळे शहरात प्रदुषण वाढत आहे.या वाहनात जास्तीतजास्त वाहने आज राँकेलमीश्रीत पेट्रोलवर चालतात.रस्त्यावर जिकडेतिकडे प्रदूषीत हवेने व धूराने जनता त्रस्त आहे पण प्रशासन मात्र मस्त आहेत.सकाळी विद्यार्थी शिकवणी वर्गास जातात तर सकाळच्या शुध्द हवेत आरोग्यासाठी आवश्यक व्यायाम म्हणुन जेष्ठ नागरिक पहाटचालीकरीता बाहेर पडतात पण त्यांचे स्वागत होते ते अँटोमधून निघणा-या दूषित धूराने.याकडे वाहतूक पोलीस व प्रशासनाचे मुळीच लक्ष नाही.अन्न पुरवठा विभागाचे सुध्दा याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
व दिवसेंदिवस जनतेच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.सर्रास होत असलेल्या राँकेलच्या वापराने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे याकडे शासन व प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.
Post a Comment