मालेगाव (समीर देशमुख)
धर्माला विविध व्याख्या आहेत देव शोधाय पेक्षा माणूस शोधा सद्यस्थितीत समाज कर्तव्यप्रणव बनविणाऱ्या भगवंताचा विचार सध्या कोणीही मांडतांना दिसत नाही माणूस हा माणसाशी पूरक बनावा सदाचारी आणि विचारवंत बनावा तसेच समाज परिवर्तना करिता वैचारिक क्रान्तिची गरज आहे असे मोलाचे मार्गदर्शन प पु जोमानंद महाराज यांनी केले ते येथील महामहेश्वर काशिनाथ बाबा खिर्डा संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते यावेळी मंचकावर खा. संजय धोत्रे, खा.भावनाताई गवळी, खा.अनंतराव देशमुख, आ. अमितजी झनक, माजी आ. विजयराव जाधव, बाबाराव खडसे, सौ रातप्रभाताई घुगे, दिलीपराव जाधव, गजानन देवळे, बबनराव चोपडे, भगवानराव शिंदे, जेष्ट पत्रकार माधवराव अंभोरे महामहेश्वर काशिनाथ बाबा खिर्डा संस्थानचे अध्यक्ष सचिव व ट्रष्टी यांची उपस्थिती होती पुढे बोलतांना प पु जोमानंद महाराज म्हणाले की भगवान क्रिष्णाने दानव समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करून समाजात प्रेम शिकवली यमुनेच्या डोहात स्नान करणाऱ्या स्त्रीयांची रूढी बंद करण्या करिता इंद्रयोग सोडून गोवर्धन पूजा करण्याची शिकवण दिली तेथेही देवाने परिवर्तन घडविले धरती अन्न पुरवते यातून निसर्ग प्रेम घडवते समाजाला निसर्गाशी जोडले आहे आकाशातून पडलेले पाणी कुण्या जाती पातीचा विचार करून पडत नाही झाड फळ देते ते कोणत्या जातीचे नाही मग जाती भेद कशाला युक्ती प्रतियुक्ती कशी वापरायची ह्याचे सर्व शिक्षण गुरुकुल आध्यात्माचा पाया दिला जातो ते गुरुकुल आहे असेही ते बोलतांना म्हणाले यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदयकुमार मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन महेश्वर काशिनाथ बाबा खिर्डा संस्थानचे अध्यक्ष सचिव ट्रष्टी यांनी मानले.
Post a Comment