परीक्षा केंद्रला भेट देतांना शिक्षणाधिकारी डॉ श्रीराम पानझाड़े |
स्पर्धा परीक्षेची रुपरेशा विद्यार्थ्यांना समजावी तसेच हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ति मिळावी यासाठी आयोजित करण्यात येत असलेली शिषवृत्ति परीक्षा तालुक्यातील 14 केंद्रावर शांततेत पार पडली. या दरम्यान शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक किरण कुलकर्णी, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी शहरातील चांदूर कन्या शाळा, मन्नालाल शाळा, व जिल्हा परिषद हायस्कूल या केंद्राला भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत नव्याने बदल करण्यात आला होता तशा सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तालुक्यात वर्ग 5 वी चे सात केंद्रामधे 510 विद्यार्थी तर वर्ग 8 वी चे सात केंद्रात 514 असे 1024 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 43 विद्यार्थी गैरहजर होते. तालुक्यातील सर्व केंद्रावर विषय साधन व्यक्ति यांनी भेटी देऊन केंद्राचा आढावा घेतला.
Post a Comment