BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

घुईखेड येथे मतदार जनजागृती रॅली - हात फलक, पोस्टर यांच्या माध्यमातून केली जागृती


एसडीओ श्री वऱ्हाडे , तहसीलदार राजगडकर, बिडीओ अंदेलवाड, ना. तहसीलदार बडिये, बिईओ इंगळे यांची उपस्थिती



चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

जिल्हा परिषदच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर झाल्या असुन येत्या २१ फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.त्यामूळे प्रत्येक गावागावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी घुईखेड येथे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये घुईखेड येथील विद्यार्थी सहभागी होऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश दिला. घुईखेडच्या बेंडोजी बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथून मतदार जनजागृती रॅलीला सुरूवात झाली. चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी श्री ललित वऱ्हाडे यांनी रॅलीत स्वयंस्फूर्तीने  सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत तहसीलदार बि.ए.राजगडकर, नायब तहसीलदार दिनेश बडीये, श्रीकांत विसपुते, गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे , मंडळ अधिकारी एस.एस.लंगडे,तलाठी धोटे सामिल झाले होते. संपूर्ण रॅली घुईखेड (पुनर्वसन),टिटवा (पुनर्वसन) या गावातून फिरून हात फलक व बॅनर दाखवून जनजागृती केली. यावेळी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले. या रॅलीत प्राचार्य खांडेकर, ग्रामविकास अधिकारी पांडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रा.पं.कर्मचारी, बेंडोजीबाबा विद्यालय व जि.प.शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

Share this:

1 comment :

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.