येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात दि.२७ फेबु्रवारी रोजी चौथे बीड जिल्हा शिक्षक साहित्य संम्मेलन आयोजीत करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यीक प्रा.डॉ.वीरा राठोड यांच्या हस्ते होणार आहे. संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक नागनाथ बडे तर स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी राहणार आहे.
संमेलनासाठी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, परळी न.प.चे उपाध्यक्ष आयुबखॉं पठाण, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, साहित्यीक आबासाहेब वाघमारे, शिक्षणाधिकारी शशीकांत हिंगोणीकर, प्रा.विजय मुंडे, परिवर्तन सा.चळवळीचे अध्यक्ष प्रा.गौतम गायकवाड, मसाप अध्यक्ष चंदुलाल बियाणी, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, अदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने सा.शिक्षण मार्गच्या वतीने देण्यात येणारा शिक्षक गौरव पुरस्कारामध्ये वैद्यनाथ विद्यालयाच्या सौ.गवळणबाई देविदास पवार, जिल्हा पदिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक जी.बी.शेख, छत्रपती संभाजी विद्यालयाचे सहशिक्षक सुभाषराव सवई, केंद्र प्राथमिक शाळा लाडझरी येथील उत्तरेश्वर मिटकरी, जि.प.प्रा.शाळा वडखेल, बालाजी बोईनवाड परभणी येथील स्वतंत्र्य सैनिक कै.रामराव कान्हेकर निवासी मुकबधीर विद्यालयाचे संतोष पोटभरे, संत धुराबाई आश्रम शाळेचे शिक्षक बालाजी कांबळे, बालाजी माध्यमिक विद्यालयाचे राजेंद्र डापकर तर जि.प.प्राथमिक शाळा सेलु परळी येथील साहेबराव पोकले यांचा समावेश आहे.
शिक्षक साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते याशिक्षकांचा गौरव होणार आहे. या साहित्य संम्मेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत समितीचे रानबा गायकवाड, ए.तु.कराड, शिवाजीराव बनसोडे, पी.के.सुरवसे, अजय कुमार गंडले, प्रा.डॉ.माधव रोडे, प्रा.शांती लाहोटी, प्रा.जगदीश जगतकर, मुख्याध्यापक एन.के.सरवदे, एस.एस.रोडे, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव बनसोडे, मुख्याध्यापक शास्त्री कांबळे, मुख्याध्यापक के.डी.कांदे, बालाजी गुट्टे, लिंगाना उमरीवाड, अशोक नावंदे, सतिष कारेपुरकर, सौदागर कांदे, भारत मगर विजय शिंदे, चंद्रशेखर फुटके, राजेंद्र जाधव, प्रा.रामकिशन चौधरी, चंद्रमणी वाघमारे, विकास वाघमारे, महादेव गित्ते अदिंनी केले आहे.
Post a Comment