BREAKING NEWS

Sunday, February 26, 2017

राजीव गांधी जिवनदायी योजनेत 971 आजारांसाठी वैद्यकीय कवच-* आरोग्य मित्र देतील सुविधा * टोल फ्री वर करता येईल तक्रार * तक्रारीची दखल घेण्यासाठी यंत्रणा


वाशिम / महेन्द्र महाजन  :-



राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रूपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना थेट मदत मिळणार असून योजना 971 आजारांसाठी वैद्यकीय मदत मिळणार आहे. रूग्णालयाच्या माध्यामातून थेट रूग्णांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहे. रूग्णांपर्यंत सेवा पोहचविताना काही अडचण निर्माण झाल्यास टोल फ्री वर तक्रार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचा पहिला टप्पा 2 जुलै 2012 पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर , धुळे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला मिळवा या उद्देशाने 21 नोव्हेंबर 2013 पासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. दारिद्रयरेषेखालील पिवळी, अन्नपूर्णा, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे आणि दारिद्रयरेषेवरील एक लक्ष रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा कुटुंबियांना विमा संरक्षणाद्वारे 971 आजारांवर वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल.
या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी आरोग्य मित्र, पो.बॉ. क्रमांक 16565 , वरळी पोस्ट ऑफीस, वरळी, मुंबई या पत्त्यावर अथवा www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर किंवा वैद्यकीय सेवेचा लाभ घेताना येणार्‍या तक्रार निवारण्याकरिता थेट 155388/1800 233 2200 या टोल फ्री क्रमांकारवर संपर्क साधता येणार आहे. योजनेच्या लाभासंदर्भात मदत हवी असल्यास किंवा तक्रार असल्यास 1800 233 2200 या क्रमांकावरही आपली तक्रार नोंदविता येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी  यांनी दिली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.