महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले असले तरी तेवढ्य़ाच प्रमाणात शिवसेना माघारली. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा एमआयएम लयभारी ठरला असून शिवसेनेला या निवडणुकीत ७ तर एमआयएमने १० जागांवर विजय मिळविला असल्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत शहरात एमआयएम संघटनेची ताकद बळावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणुकीत एमआयएम पक्ष आपले खाते उघडेल असे सर्व सामान्य नागरिकांना वाटत होते. परंतु दोघांचे भांडणात तिसर्याचा लाभ म्हणतात ती म्हण अगदी खरी ठरली. नेहमी दोन नंबर राहणारा शिवसेना पक्ष या मनपाच्या निवडणुकीत तब्बल चार नंबरवर फेकल्या गेला. भाजपा - सेनेची युती नसली तर सेनेतील अंतर्गत कलह समोर आला व त्याचाच नेमका फायदा इतर पक्षाला मिळाला. भाजपा -सेनेची युती असती तर एक बलाढय़ पक्ष समोर आला असता आज सेनेची स्थिती न 'घर का ना घाट का' अशी झाली आहे. बोटावर मोजण्या एवढे केवळ सहा नगरसेवक मनपात निवडून आलेत. अमरावती जिल्ह्याला शिवसेनेचे खासदार असताना पक्षाची ही स्थिती व्हावी, यापेक्षा गंभीर दुसरी बाब कोणती असू शकते. ही निवडणूक म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला आपली किती ताकद आहे हे दाखविण्याची खर्या अर्थाने वेळ होती. मग याचाच अर्थ असा धरावा की भाजपाच्याच भरोश्यावर आजपर्यंत शिवसेना होती. भाजपामुळे सेनेची हिंमत कमी पडली. हे म्हणजे योग्य होईल. भाजपा सत्येत आल्यावर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असे वाटत होते. परंतु शिवसेनेच्या अंतर्गत कलहाने आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेपेक्षाही इतर पक्षाने आपली ताकद दाखवून दिली.
एमआयएम पक्षाने पहिल्यांदाच मनपा निवडणुकीत उडी घेतली आणि आपली ताकद दाखवून दिली. अशीच ताकद एमआयएमची वाढतच गेली तर एक दिवस एमआयएमचा महापौर बसण्यास वेळ लागणार नाही. एमआयएमला आमचा विरोध आहे, असे नाही. तो देखील एक पक्षच आहे. नवीन पक्ष जर पहिल्याच वेळेस एवढय़ा प्रमाणात ताकद दाखवू शकते. तर इतर राजकीय पक्ष त्यांचे तुलनेत मागे का? हा एक गंभीर विचार करणारा विषय आहे. त्याच तुलनेत काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. परंतु काँग्रेसने तब्बल ४० वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही या निवडणुकीत काँग्रेसचे खच्चीकरण व्हावे, आज जी स्थिती भाजपाची आहे. तशीच स्थिती एकेकाळी काँग्रेसची होती. परंतु काँग्रेसला उच्च रक्तदाब झाल्याने काँग्रेसची स्थिती आज झाली ती इतर कोणत्याही पक्षाची होऊ नये, त्याचप्रमाणे मनपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्णपणे खच्चीकरण झाले. आज नावा पुरताही राकाँ पक्ष राहिला नाही. इतर पक्षाची अशीच वाटचाल राहीली तर अनेक नामवंत पक्ष नेस्तनाबुत व्हायला वेळ लागणार नाही. सध्या स्थितीत अमरावती मनपात एमआयएमला 'अच्छे दिन' आले ऐवढे मात्र नक्की.
Post a Comment