समाजामध्ये जगत असताना सर्व धर्म समभावाची जोपासना व समाजात आपुलकीची भावना ठेवून समाजाला आपल्यापासून काहीतरी देत जाव व थोर महापुरूषाचे विचार प्रत्येकाने अंगीकारावे असे प्रतिपादन सप्तखंजरी वादक राष्ट्रीय किर्तनकार इजिनीयर उदयपाल महाराज वणीकर यांनी मालेगांव तालूक्यातील सोमठाणा येथे आयोजित जाहीर किर्तनात प्रबोधन केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा व कै. संभाजी मापारी गुरूजी यांच्या पुण्यतिथी निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा सोमठाणा मुख्याध्यापक दादाराव शिंदे तर उद्घाटक म्हणून माजी सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद वाशिमचे चक्रधर गोटे होते.प्रमुख पाहूणे म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष सुभाषराव बोरकर , मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रा.भरत आव्हाळे ,जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर , जि. प. शिक्षक पतसंस्था संचालक नागेश कव्हर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल पाटिल राऊत, आगार व्यवस्थापक वाशिम रवि मोरे, जिल्हा सचिव महाराष्ट्र इजिनीयर असोसिएशन अमोल पाटिल गायकवाड, माय मिराई कोचींग क्लासेस रिठद संचालक माधवराव बोरकर, वीर भगतसिग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष नारायणराव शिंदे, संभाजी ब्रिगेड मालेगांव तालूकाध्यक्ष कृष्णा देशमुख, संभाजी ब्रिगेड वाशिम तालूकाध्यक्ष राजु कोंघे, शिवव्याख्याते संदिप गोटे, शंकर भारती , युवा नेते प्रदिप पाटील मोरे, नेहरू युवा केंद्र पंकज गाडेकर,संभाजी ब्रिगेड श्रीराम कालापाड, पोलिस स्टेशन वाशिम ग्रामीण संतोष वाणी, मंंगेश मालवे,खरेदी विक्रीचे संचालक मालेगांव भाऊराव खंदारे, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद खंदारे, भगवान खंदारे, गट ग्रामपंचायत सदस्य सौ. केशर खंदारे, गजानन मापारी, शंकर खंदारे, विश्रामजी खंदारे, पोलिस पाटिल बळीराम खंदारे, तुकाराम मापारी आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण सोमठाणा वासीयांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन भागवत मापारी यांनी तर प्रास्ताविक नारायण शिंदे तर आभार अभी पाटिल खंदारे यांनी मानले.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
Post a Comment