अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडत असताना अखेरपर्यंत विरोधकांनी गदारोळ सुरु ठेवत आपला विरोध दर्शवला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. या गदारोळात सुधीर मुनगंटीवारांनी संपुर्ण अर्थसंकल्प मांडला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर विधानसभवन मधील काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये विरोधी पक्ष आमदारांची बैठक झाल्यानंतर विधानभवन पायऱ्यांवर बसून काळ्या फिती लावून मूक निदर्शने केली. शेतकऱ्यांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आहे की लोकशाही... झुगारून देऊ ठोकशाही..., मुस्कट दाबीने दबणार नाही... बळीराजाची लढाई थांबणार नाही..., नहीं सहेंगे नहीं सहेंगे, अन्याय हम नहीं सहेंगे..., मागितली कर्जमाफी मिळाले निलंबन... आदी फलके दाखवून विरोधी पक्ष आमदारांनी विधानसभेचे कामकाजावर बहिष्कार नोंदविला. त्यानंतर विरोधी पक्ष आमदारांच्या शिष्ट मंडळांनी राज्यपालांची भेट घेऊन घडलेल्या घटनाक्रमाची माहिती राज्यपालांना दिली. सरकारने नियम बाजूला सारून निलंबनाचा ठराव मांडल्याचे त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
# निलंबित आमदार
@ काँग्रेस
कुणाल पाटील – धुळे ग्रामीण मतदारसंघ
हर्षवर्धन सकपाळ – बुलडाणा
अमर काळे – आर्वी - वर्धा
डी.पी. सावंत – नांदेड उत्तर
अब्दुल सत्तार – सिल्लोड - औरंगाबाद
संग्राम थोपटे – भोर - पुणे
अमित झनक – रिसोड
जयकुमार गोरे – माण - सातारा
विजय वडेट्टीवार- काँग्रेस
@ राष्ट्रवादी
भास्कर जाधव – गुहागर मतदारसंघ
जितेंद्र आव्हाड – ठाणे
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी
वैभव पिचड – अकोले - अहमदनगर
मधुसूदन केंद्रे – गंगाखेड
नरहरी जिरवाळ – दिंडोरी - नाशिक
दत्ता भरणे – इंदापूर - पुणे
संग्राम जगताप – अहमदनगर
दिपक चव्हाण – फलटण - सातारा
राहुल जगताप – चिखली - बुलडाणा
Post a Comment