याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, आशाबाई खडसे यांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, चवदार तळ्याचे पाणी संजीवनी किंवा अमृत नव्हते. तर तो हक्कासाठीचा थेट लढा होता. समानतेसाठीचा धडा होता. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श करुन क्रांती निर्माण केली. त्या स्मृतींना चिरकाल उजाळा देण्याचे कार्य बहूजन समाज बांधवांनी केले पाहीजे. हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल. त्यानंतर मान्यवरांनी महाड सत्याग्रह निर्माण होण्याविषयीची सविस्तर पार्श्वभूमि आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाला तनुश्री वैद्य, सोनल तायडे, पुष्पा तुरेराव, स्नेहल तायडे, निवृत्ती कांबळे, मुरलीधर भालेराव, अर्निश उचित, विजय सोनोने इत्यादींची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन संस्था सचिव अरविंद उचित यांनी केले.
Monday, March 20, 2017
90 वा महाड सत्याग्रह स्मृती कार्यक्रम उत्साहात
Posted by vidarbha on 8:02:00 PM in वाशिम / महेंद्र महाजन जैन | Comments : 0
वाशिम / महेंद्र महाजन जैन
वाशीम - भिक मागून किंवा रडून न्याय मिळत नाही, त्यासाठी आपल्यातील तेजाचे सहाय्य घेतले पाहीजे. अशाच जाणीवेमुळे मानवाच्या मुलभुत गरजांसाठी चवदार तळे सत्याग्रहाचा जन्म झाला असे मत कवियत्री तथा अभिनेत्री हंसिनी उचित यांनी व्यक्त केले. स्थानिक दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने संस्थेच्या अल्लाडा प्लॉट स्थित कार्यालयात सोमवार, 20 मार्च रोजी आयोजीत कार्यक्रमात संस्थाध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, आशाबाई खडसे यांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, चवदार तळ्याचे पाणी संजीवनी किंवा अमृत नव्हते. तर तो हक्कासाठीचा थेट लढा होता. समानतेसाठीचा धडा होता. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श करुन क्रांती निर्माण केली. त्या स्मृतींना चिरकाल उजाळा देण्याचे कार्य बहूजन समाज बांधवांनी केले पाहीजे. हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल. त्यानंतर मान्यवरांनी महाड सत्याग्रह निर्माण होण्याविषयीची सविस्तर पार्श्वभूमि आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाला तनुश्री वैद्य, सोनल तायडे, पुष्पा तुरेराव, स्नेहल तायडे, निवृत्ती कांबळे, मुरलीधर भालेराव, अर्निश उचित, विजय सोनोने इत्यादींची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन संस्था सचिव अरविंद उचित यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, आशाबाई खडसे यांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, चवदार तळ्याचे पाणी संजीवनी किंवा अमृत नव्हते. तर तो हक्कासाठीचा थेट लढा होता. समानतेसाठीचा धडा होता. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श करुन क्रांती निर्माण केली. त्या स्मृतींना चिरकाल उजाळा देण्याचे कार्य बहूजन समाज बांधवांनी केले पाहीजे. हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल. त्यानंतर मान्यवरांनी महाड सत्याग्रह निर्माण होण्याविषयीची सविस्तर पार्श्वभूमि आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाला तनुश्री वैद्य, सोनल तायडे, पुष्पा तुरेराव, स्नेहल तायडे, निवृत्ती कांबळे, मुरलीधर भालेराव, अर्निश उचित, विजय सोनोने इत्यादींची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन संस्था सचिव अरविंद उचित यांनी केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment