Monday, March 20, 2017
जागतीक चिमणीदिन उत्साहात साजरा
Posted by vidarbha on 8:00:00 PM in जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन | Comments : 0
जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन
वाशीम - भर उन्हाळ्यात मानवाची तहान भागविण्यासाठी अनेक सामाजीक संघटना, समाजसेवी पुढाकार घेत असतात. मात्र गत आठ वर्षापासून दरवर्षी पशुपक्षांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याकरीता सामाजीक कार्यकर्ते, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ. दिपक ढोके पुढाकार घेत असून पक्षांकरीता एक हजार कुंड्यांचे जिल्हयात वितरण करण्यात येते. पशुपक्षांकरीता पाणपोई हाच खरा मानवधर्म असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्षा सोनालीताई जोगदंड यांनी व्यक्त केले. स्थानिक नगर परिषद रोडवर विठ्ठलवाडी मार्गावर 20 मार्च जागतीक चिमणीदिनानिमित्त सोमाणी व डॉ. ढोके यांच्या पुढाकाराने पक्षांकरीता कुंडी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभात त्यांनी वरील विचार व्यक्त केले. यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. निता ढोके, संभाजी ब्रिगेडचे कृष्णा चौधरी, राजु कोंघे, वैभव रणखांब समवेत डॉ. ढोके व सोमाणी उपस्थित होते. यावेळी नविन आयुडीपी व वेगवेगळ्या शहरातील भागात कुंड्यांचे वितरण करण्यात आले. प्रत्येकाने सामाजीक क्षेत्रात योगदान देवून घरासमोर, भिंतीवर, झाडावर उन्हाळ्यात पक्षांकरीता पाण्याची सुविधा उपलब्ध करावी असे आवाहन डॉ. दिपक ढोके व निलेश सोमणी यांनी यावेळी केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment