आज सेलू नगर परिषद् आयोजित स्वच्छ्ता अभियान अंतर्गत सकाळी साडे आठ वाजता लाभर्थ्याना अनुदान वाटप करण्यात आले.या वेळी उपस्थित
जिल्हा अधिकारी राहुल रंजन महीवाल,उपजिल्हाअधिकारी पांडुरंग बोरगांवकर तहसीलदार आसाराम छड़ीदार तसेच नगर अध्यक्ष विनोद बोराडे,उपनगर अध्यक्ष प्रभाकर सुरवसे मुख्याधिकारी देवीदास जाधव व् इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी राहुल रंजन महीवाल यांनी प्रतिपादन केले की,
शौचालय बांधन्याची प्रत्येक नागरिकांची जवाबदारी आहे तसेच स्वच्छ्ता आणि आरोग्य जपन्यासाठी परिसरात स्वछता ठेवणे गरजेचे आहे.शाषण स्तरातुन आलेल्या जो काही निधी असतो त्या निधिचा गैरवापर टाळणे आणि सामाजिक कामांसाठी त्याचा वापर करुण आरोग्य जपने तसेच शौचालय निधिचा जर गैर वापर झाला तर त्या व्यक्ति वरती गुन्हा दाखल करण्यात येईल त्या मुळे लाभार्थी व्यक्तिने शौचालय बांधलेच पाहिजे असा आग्रह या वेळी केला.
उपजिल्हा अधिकारी पांडुरंग बोरगांवकर=प्रत्येक नागरिकांनी नगर परिषद् चे कर वेळो वेळी भरला पाहिजे तसेच सार्वजानिक ठिकाणी उघड्यावर शौचालय ला जाऊ नये तर घरी बांधून घेणे नसता सार्वजनिक शौचलयाचा वापर करुण गैरसोय कमी करावी व् स्वच्छ्ता ठेवन्यासाठी सामजिक कार्यात अग्रेसर रहावे असे प्रतिपादन केले..
नगर अध्यक्ष विनोद बोराडे=
सर्व जनतेला विनंती करण्यात आली की आपल्याला आलेली रक्कम ही व्यक्तिक कामाला न वापर करता त्या निधि चा वापर शौचालय बंधन्यासाठी करवा तसेच शाषण स्तरमधून आलेल्या विविध सूचना या वेळी सांगितल्या तसेच जे ही नागरिक शौचालय नाही बांधले तर एप्रिल महिन्यात कारवाई करण्यात येईल असे सांगितले..
या वेळी 20 लाभार्थी ला सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमानपत्र देण्यात आले..
स्वच्छ्ता रॅली =नगर परिषद् सेलू यांच्या वतीने स्वच्छ्ता सन्देश देणारी रॅली काढण्यात आली.शाळकरी विद्यार्थी तसेच महिला यांच्या हातात स्वच्छ्ता संदेश देणारी फलक देण्यात आली.या वेळी जिल्हाअधिकारी यांनी झेंडा दाखून रॅली ला सुरवात केलि या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या होती.
कार्यक्रमच्या यशश्वी साठी नगर परिषद् चे स्वछता अभियानचे शेख अयूब तसेच सर्व कर्मचारी बांधव व् अधिकारी नी मेहनत घेतली...व् सूत्रसंचालन अवधूत लिपने ।आणि पत्रकार मोहन बोराडे यांनी केले.
Post a Comment