महेंद्र महाजन जैन / रिसोड /वाशीम -
स्थानिक लोणी फाट्यावरील पुंडलिक गवळी चौकात रंजवे यांच्या हॉटेलसमोरील डी. पी ने भरदुपारी अचानक पेट घेऊन भडका घेतला.अचानक लागलेल्या आगीमुळे उपस्थित नागरिक व आजूबाजूच्या दुकानदाराची एकच तारांबळ उडाली.उपस्थितांनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे पर्यंत करून आग अग्निशामक येण्यापूर्वी आग विझवली व मोठा अनर्थ टळला.रिसोड शहरातील अनेक ठिकाणी डि.पी वाजवीपेक्षा जास्त भार असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना यापूर्वही अनेकवेळा घडल्या.शहरातील अनेक डि.पी लोणी फाटा, आंबेडकर चौक,चाफेश्वर डि.पी जिजाऊ चौक हिंगोली नाका, या ठिकाणच्या डी.पि वर सतत अधिभार वाढत आहे तरी याकडे म.रा.वि.वि.मंडळाने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा संभाव्य धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज पेट घेतलेली डीपी जळणे नित्याचेच झाले आहे वारंवार तीच घटना होत असूनही मंडळाकडून उचित कार्यवाही होताना दिसत नाही या कामचलाऊ धोरणामुळे व्यावसायिकांचे नुकसान होण्याची भीती कायम असते तर त्या डीपी वरून पुरवठा असणाऱ्या ग्राहकांना उन्हाळ्यात तापणाऱ्या उन्हात उकडावे लागते तर दिवस रात्र विद्युत पुरवठा खंडित राहतो.शहरातील सर्व डीपी वरील भार कमी करून जळालेली कोणतीही डीपी तात्काळ बदलण्याची मागणी जनतेतून होत आहे.
Thursday, March 30, 2017
भर उन्हात डी.पी ने घेतला पेट नागरिकांच्या सतर्कतेमूळे अनर्थ टळला
Posted by vidarbha on 6:09:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड /वाशीम - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment