
अमरदास इंग्रजी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना नियमित योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिक्षिका सोनल श्रीराव यांच्याकडून केले जाते. शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक,मानसिक व शारीरिक विकास साधने अपेक्षित आहे.नियमित योगा केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळणे सहज शक्य होते तर ज्याची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम आहे अशी कोणत्याही वयोगटातील व्यक्ति अध्यापन किंवा अध्ययन अधिक प्रभावीपणे करू शकते असा विश्वास सोनल श्रीराव सह अमरदास शाळेतील इतर शिक्षकांना वाटतो या स्तुत्य उपक्रम विद्यार्थी आनंदाने सहभागी होऊन लोमविलोम,कपालभाती प्राणायाम इत्यादी प्रकार सहज करतात
नर्सरी ते तिसऱ्या वर्गापर्यंत विद्यार्थी असलेल्या या शाळेत विविध उपक्रम नियमित सुरूच असतात मुख्याध्यापक वाशिमकर व प्रभारी सोनल श्रीराव सह ज्योती राऊत, नीता खडसे, ज्योती तुरूकमाणे,पूजा काळे, विशाल जामदार, प्रज्वल केदारे इत्यादी शिक्षक शिक्षिका नियोजना करिता परिश्रम घेतात.
Post a Comment