वाशिम मार्गावरील हराळ फाट्याजवळ शेतकऱ्याच्या धुऱ्यालगत व राज्य मार्गावरील गवताला जाळण्याकरिता लावलेल्या आगीने जवळपास वीस वर्षाच्या पंचवीस फूट उंचीच्या डेरेदार झाडाने पेट घेतला , बुंधा आतून जळाल्याने हिरवेगार झाड धरातीर्थी पडले या अतिशय अक्षम्य चुकीचा जबाबदार कोण? झाडांची संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी शासकीय यंत्रणा किंवा निसर्गाचा पुळका बाळगणाऱ्या तथाकथित संस्था केवळ नावापूरत्याच उरल्यात काय ?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. असे झाड जाळण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना कोणत्याही लोकजागृतीची चळवळ काम करतांना
दिसत नाही. शेतकरी सध्या अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असून अशा झाड पेटण्याच्या घटनेमुळे संकट अधिक गडत होत असून सातत्याने अजाणतेपणे नैसर्गिक ऱ्हास होत आहे. उन्हाळ्याच्या ४०अंश तापमानात ज्या झाडांमूळे उन्हापासून संरक्षण मिळते त्या झाडांपर्ती एवढी असंवेदनशिलता हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.थोड्याशा स्वार्थापायी मानूस स्वतःचेच कधीही भरून न निघणारे नुकसान करीत आला आहे.धुऱ्यावरील गवत जाळण्याचा स्वार्थी प्रवृत्तीने वीस वर्षाच्या झाडाचा बळी घेतला या झाडाला श्रद्धांजली म्हणून अशा घटनांना आवर घालणे हेच अपेक्षित आहे.संबंधित विभागाने लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे.
Post a Comment