माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांनी
दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन.
चांदूर रेल्वे - (शहेजाद खान )
औरंगाबाद येथील शेतकरी रामेश्वर भुसारी यांचे वादळामुळे पॉलीहॉऊसचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या डाक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी अडवून मारहाण केली. या घटनेचा जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
आधीच शेतकरी वादळात सापडला व आता पोलीसी वादळ पुन्हा त्यांच्या मागे लावणे अत्यंत निषेधार्थ आहे. जनतेचे रक्षण करणारे पोलीसच शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असून भक्षक बनले असल्याचे मत डॉ. पांडुरंग ढोलेंनी व्यक्त केले. जो शेतकरी उन्हातानात कष्ट करून उत्पन्न काढतो, या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यावर पोलिसांनी मंत्रालयात केलेल्या मारहाणीचा निषेध जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांनी मुबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केला आहे.
Post a Comment