Wednesday, March 29, 2017
मुंबई पालिका निवडणूकीत 11 लाख मतदारांची नावे गायब पण फक्त 63 तक्रारी
Posted by vidarbha on 6:28:00 AM in मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – | Comments : 0
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) –
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीत सावळा गोंधळयाचा गाजावाजा प्रचंड झाला असला तरी निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत पालिका निवडणूक कार्यालय 63 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत 11 लाखांहून अधिक मतदारांची नावे गायब असल्याची बाब समोर आली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे माहिती विचारली होती की वर्ष 2017 च्या पालिका निवडणूकीत मतदार यादीच्या बाबतीत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी निवडणूक यांनी अनिल गलगली यांस कळविले की बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीबाबत अद्याप पर्यंत फक्त 63 अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्ष 2012 आणि वर्ष 2017 च्या निवडणूकीत एकूण मतदाररांची संख्या क्रमश: 1,02,86,579 आणि 91,80,555 अशी आहे. वर्ष 2012 च्या तुलनेत वर्ष 2017 च्या पालिका निवडणूकीत 11 लाख 6 हजार 24 अशी मतदारांच्या संख्येत तफावत होती. असे असताना निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीचे फक्त 63 अर्ज स्पष्ट करते की आजही मतदार आपल्या अधिकाराला घेऊन इतके गंभीर नाही आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment