चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
दर्शनासाठी भक्तांचा रांगा |
विटेवर कापुर जाळतांना भाविक |
तिनशे वर्षापूर्वी अवधुत पंथ स्थापना करणारे श्री.कृष्णाजी अवधुत महाराजांच्या पावन सावंगा
विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर लोटला. लाखोंनी कृष्णाजी
महाराजाच्या समाधीचे दर्शन घेवून लाखो रूपयाचा कापुर जाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.
दुपारच्या भर उन्हात समतेचे प्रतिक देव व भक्ताच्या ७० फुट उंच झेड्यांना पदस्पर्श न करता
नवीन खोळ चढविण्याचा भव्य, दिव्य, चित्तथरारक धार्मिक विधी लाखो भाविकांनी आपल्या
हृदयात जपुन ठेवल्या. www.vidarbha24news.com
महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्री.कृष्णाजी अवधुत महाराजांच्या
गुढीपाडवा यात्रेला मंगळवार (ता.२८)पासून सुरूवात झाली. मिळेल त्या वाहनाने लाखो भाविक
कृष्णाजी महाराजाच्या दर्शनासाठी सावंग्यात दाखल झाले होते. त्यामूळे सावंगा विठोबा
मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तर दूरवरचे असंख्य भाविक वयोवृध्द,
बायका-लेकरांसह सावंग्यात आधीच दाखल झाले होते. पहाटेपासूनच भाविकांची
दर्शनासाठी गर्दी वाढली. त्यामूळे मंदिरासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाची
कृष्णाजी महाराजाच्या समाधी दर्शनासाठी धडपडत सुरू होती. भर उन्ह्यात आबालवृध्द मिळेल
त्या ठिकाणी हातावरील विटेवर कापूर जाळून कृष्णाजी महाराजाच्या प्रती श्रध्दा व्यक्त करीत
होते. तर अनेकजन नवसानुसार आप्त स्वकियांच्या वजनाच्या भारोभार कापूर जाळतांना
दिसत होते. त्यामूळे मंदिर परिसर कापूरचा सुगंध व भाविकांनी फुलला ता. ७० फुट उंच
झेंडयांना आबालवृध्द रखरखत्या उन्हात दंडवत प्रणाम घालत होते. यात्रेकरूनी मंदिर परीसरात
राहुटया उभारून नवसाचे जेवन देत होते. पारंपारीक झांज व मृदंगाच्या साथीने संपूर्ण परिसर
अवधुती भजनात रंगले होते.
७० फुट उंच झेंड्यांना नवीन खोळ
७० फुट उंच झेड्यांची जुनी खोळ काढतांना हभप श्री चरणदास कांडलकर |
दुपारी ४ वा ७०फुट व व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याला सुरूवात
झाली. हभप चरणदास कांडलकर यांनी आंघोळ करून नवीन कपडे चढविले. मंदिराचे विश्वस्त
गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, विनायक पाटील, रूपसिंग
राठोड, दत्तुजी रामटेके, कृपासागर राऊत, अनिल बेलसरे, दिगांबर राठोड, पुंजाराम
नेमाडे,स्वप्निल चौधरी सह चरणदास कांडलकर यांनी श्री कृष्णाजी महाराजाच्या बोहलीचे
दर्शन घेतले. झेंड्यांचे विधीवत पुजनानंतर हभप कांडलकर यांनी दोन झेंड्यांना पद स्पर्श न
करता दोरखंडयाच्या साहयाने दोन उंच झेंडयांना बांधत जुनी खोळ काढत ते उंच टोकावर
पोहचले. यावेळी अवधुती भजनाची अखंड मांड सुरू होती. प्रत्येकजन श्वास रोखुन हा क्षण
पाहत होता. झेंड्याच्या टोकावर पोहचल्यावर दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत हभप
कांडलकर खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा दोन तास चालला.
सावंगा विठोब्यात पाणी टंचाई
पाणी टंचाई
|
केल्याने सावंग्यात पाणी टंचाई जाणवत होती. ग्रा.पं.ने टँकरव्दारे पाणी पुरवठा केला. मात्र
अनेक ठिकाणी पाणी पोहचले नसल्याची ओरड होती. महिलांसाठी प्रसाधनगृह व शौचालयाची
व्यवस्था नसल्याने गैरसोय झाली. आरोग्य विभागाने यात्रेकरूच्या सोईसाठी १०८ व १०२
अॅब्युलन्स आणि डॉक्टरांची व्यवस्था केली होती.आगीसारख्या आपत्तीवर मात करण्यासाठी
अग्नीशामन दलाची गाडी सज्ज होती.
पोलीसांचा चोख बंदोबस्त
१६ पोलीस अधिकारी व ११३ पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण दलांच्या साह्याने दर्शनासाठी
भाविकांच्या रांगा लावल्या. तसेच यात्रा, वाहतूक व तलाव सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला
होता. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोख व्यवस्था ठेवली होती. तर चांदूर रेल्वे
व अमरावती एसटी आगाराने सावंगा विठोबा येथे जाण्यासाठी विशेष एसटी बसची व्यवस्था
केली होती.
Post a Comment