मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणाऱ्या पिकविमा भरपाईच्या रकमेतून बँकांनी परस्पर कर्जवसुली करण्याच्या शासनाच्या आदेशावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. पिकविम्याच्या रकमेतून बेकायदा कर्जवसुली केल्याने विम्याचा उद्देशच सफल होत नसल्याने शासनाने कर्जवसुलीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.
शेतकऱ्यांना पिकविम्याच्या भरापाईपोटी मिळणाऱ्या रकमेतून कर्जवसुलीची रक्कम कापून घेण्याचे आदेश सहकार विभागाने बँकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील नवीन आदेश 22 मार्च रोजी काढण्यात आला आहे. हा मुद्दा विधान परिषदेत विशेष बाब म्हणून उपस्थित करताना मुंडे यांनी बँकांनी बेकायदा कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी विमा काढण्याचा उद्देश हा पिकांचे नुकसान झाल्यास अडचणीच्यावेळी आर्थिक मदत व्हावी, असा असतो. परंतु, सरकार परस्पर कर्जवसूली करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलत आहे, असे मुंडे म्हणाले. बँकांची आर्थिक स्थिती कर्जवसुलीअभावी कमकुवत होत असल्याचं कारण देत शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या रकमेतून कर्जवसुली करणे, पूर्णपणे बेकायदा व शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने ही कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात यावी व यासंदर्भातील सर्व आदेश रद्द करावेत, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
Thursday, March 30, 2017
शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या रकमेतून बेकायदा कर्जवसूली तात्काळ थांबवावी – श्री धनंजय मुंडे
Posted by vidarbha on 8:05:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment