केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यांमधील सर्व शहरांमधील उघड्यावर शौचालयाकरीता
जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये ‘नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्याचे राज्य
शासनाने ठरविले आहे.
याच अनुशंगाने स्थानिक नगर परीषदच्या गुड मॉर्निंक पथकातर्फे उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरीकांनी आपल्या कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शनिवारी जनजागृती करण्यात आली.
शहरातील मिलींद नगर व डांगरीपुरा परीसरात शनिवारी सकाळी ७ ते ९.३० च्या दरम्यान नागरीकांनी कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी स्थानिक नगर परीषद गुड मॉर्निंग पथकाव्दारे जनजागृती करण्यात आली. यामध्ये उघड्यावर शौचास बसलेल्या नागरीकांना पुष्पगुच्छ, डोक्यावर एक टोपी व जनजागृतीची एक पाटी देत शौचालय बांधणीचे आवाहन करण्यात आले. या पथकामध्ये नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेवक वैभव गायकवाड, सतपाल वरठे, न.प. कर्मचारी नितीन इमले, पराहुल इमले, प्राजक्ता पांडे, अर्चना बागडे, मिनल टट्टे, संगिता इमले, प्रकाश गिरी, चंद्रकांत गिरी, संजय वानखडे व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
Post a Comment