जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -
जिल्ह्यात दि. २ एप्रिल २०१७ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलिओ सर्व्हीलन्स ऑफिसर एस. आर. ठोसर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर, आरोग्य पर्यवेक्षकजी. एस. काझी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण होण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. शहरी व ग्रामीण पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करा. त्यासाठी सर्व संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर पल्स पोलिओ लसीकरण महिमेच्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात ० ते ५ या वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार १२३ तर नागरी भागात ३४ हजार ४६२ अशी एकूण १ लाख २५ हजार ५८५ इतकी आहे. या सर्व बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी ग्रामीण भागात ८२१ तर नागरी भागात १२२ असे एकूण ९४३ पल्स पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तेथे काम करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार १३७ तर नागरी भागात ३५९ असे एकूण २ हजार ४९६ इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. २ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ८ वा. पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बूथवर लस देण्याचे काम सुरु राहणार आहे. तसेच वीट भट्टी, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्या येथे जावून लसीकरण करण्यासठी ग्रामीण भागात २४ तर नागरी भागात ७ फिरती पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके ६ दिवस कार्याकरत राहणार आहेत. याशिवाय प्रवासातील बालकांना लस देण्यासाठी १०५ पथके कार्यरत राहणार आहेत. दि. ३, ५, ६ एप्रिल २०१७ या तीन दिवसांमध्ये ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये बुथवर न आलेले व परगावी गेलेल्या लाभार्थींचा शोध घेऊन पल्स पोलिओ लसीकरण करणायत येणार आहे. त्याचप्रमाणे दि. ३, ५, ६, ७ व ८ एप्रिल २०१७ या कालावधीत शहरी भागात अशीच मोहीम राबविली जाणार आहे. याकरिता एकूण १ हजार ९८९ पथके कार्यरत राहणार असल्याचे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.
Thursday, March 30, 2017
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
Posted by vidarbha on 6:13:00 PM in जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment