चंद्रपुर (विशेष प्रतिनिधी)-
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाला नुकतीच ईग्लंड देशातील युनिसेफ़च्या महिला अधिकारी इम्मा हेनरीऒन यांनी भेट दिली असुन, गावाची पाहणी केली. गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु असलेल्या कामाची माहिती जाणुन घेतली.
गावात विदेशी अधिका-यासह युनिसेफ़ मुंबई कार्यालयाचे वाश स्पेशालिस्ट युसुफ़ कबीर, जयंत देशपांडे, प्रायमो पुणेचे महेश कोडगिरे, उपमुख्य अधिकारी पांणी व स्वच्छता रविंद्र मोहिते, सिदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक ईल्लुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम बोकडे, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, प्रकाश उमक, बंडु हिरवे, साजिद निजामी, पंचायत समिती सिंदेवाहीचे गट समन्वयक मनोज अलोने युनिसेफ़ चमुसह कच्चेपार गावात हजर होते. गावात विदेशातील अधिकारी आल्याचे पाहुन गावक-यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या विदेशी मान्यवरांचे स्वागत गावांच्या पारंपारीक पध्दतीने करण्यात आले. चमु कडुन गावाची पुर्ण पाहणी करुन गावक-यांशी गावात केलेल्या विकास कामा विषयी चर्चा करुन माहिती जाणुन घेतली. याशिवाय गावातील शाळा,अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. गावातील घरी जावुन शौचालय वापर व स्वच्छतेच्या सवयी विषयी माहिती घेण्यात आली.
यादौ-या दरम्यान युनिसेफ़च्या चमुने जिल्हा परिषदला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदच्या जनपद सभागृहात छोटे खाणी मिटिंग घेवुन, जिल्हात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु असलेल्या कामा विषयी व जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या यशस्वी नियोजना विषयी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांनी सादरीकरण करुन चमुला माहिती दिली. चंद्रपुर जिल्हा यशस्वीपणे हागणदारीमुक्त कडे वाट्चाल करित असल्याचे पाहुन इंग्लंड वरुन आलेल्या अधिका-यांनी जिल्हा परिषदचे कौतुक केले.
Post a Comment