यवतमाळ
-
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते. क्रांतीकारकांनी देशासाठी केलेल्या कार्याविषयीची माहिती वाचून, समाजात राष्ट्राभिमान निर्माण व्हावा, तरुणांना क्रांतीकारकांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ १०० जणांनी घेतला. येथील शहीद चौकात क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. या वेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्र – अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
निवडक अभिप्राय
१. क्रांतीकारकांनी मातृभूमीसाठी केलेल्या प्रचंड त्यागाला तोडच नाही. युवकांनी त्यांचे चरित्र वाचून बोध घ्यावा, हा दिवस पाळला, त्यासाठी मी आपला आभारी आहे. – मु.प. वखटे
२. आजचा कार्यक्रम प्रेरणादायी होता. शहिदांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन देशासाठी त्याग करण्याची भावना जागृत झाली आहे.
– एन्.जे. लाखाणी
– एन्.जे. लाखाणी
Post a Comment