देहली –
बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उजव्या विचारसरणीच्या आतंकवादी संघटना वर्षानुवर्षे दंगली घडवत आहेत. तरीही त्याच आपल्याला देशभक्ती शिकवत आहेत, असे हिंदुद्वेषी ट्विट धर्मांध पत्रकार राणा अय्युब यांनी २३ मार्च या दिवशी त्यांच्या ट्विटर खात्यावरून प्रसारित केले. या वेळी अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेमींनी ट्विटरवरच प्रतिक्रिया देत राणा अय्युब यांचा निषेध नोंदवला आहे.
राणा अय्युब यांचा निषेध करणार्या राष्ट्र-धर्मप्रेमींच्या काही निवडक प्रतिक्रिया
१. श्रीमान यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले, ‘‘राणा अय्युब यातून तुमच्या विचारांची ‘परिपक्वता’च दिसून येते. खरेतर आतंकवाद्यांपेक्षा पैशांसाठी विकली गेलेली प्रसारमाध्यमे आणि पत्रकारच देशासाठी भयावह आहेत.’’
२. ‘इसिसच्या खालीद मसूद या मुसलमानाने इंग्लंडच्या संसदेवर आक्रमण केल्यावर त्याचा निषेध करणारे ट्विट राणा अय्युब यांनी का केले नाही ? एवढी दांभिकता आणि दुतोंडीपणा कशासाठी ?’, असा प्रश्न आर्ची यांनी उपस्थित केला आहे.
३. ‘जागतिक स्तरावर आतंकवादाचा ठेका तर मुसलमानांनी घेतला आहे, संघ किंवा हिंदुत्वनिष्ठांची काय मजल की त्यांनी असे
करावे ?’, अशी उपरोधिक टीका बैरागी यांनी राणा अय्युब यांच्या ट्विटवर केली आहे.
करावे ?’, अशी उपरोधिक टीका बैरागी यांनी राणा अय्युब यांच्या ट्विटवर केली आहे.
४. ‘राणा यांनी प्रथम राष्ट्रवाद जाणून घ्यावा, मग राष्ट्रभक्तीविषयी बोलावे’, ‘दांभिक राणा अय्युब यांनी या संघटनांची वैचारिक मूल्ये आणि शिस्त यांविषयी जाणून घ्यावे, मग बोलावे !’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन संस्था या आतंकवादी संघटना आहेत, तर ‘इस्लाम’चा ‘इस्लामिक स्टेट’शी काही संबंध नाही, हे आश्चर्यचकित करणारे आहे !’ यांसारख्या निषेधाच्या आणि उपरोधिक टीका करणारे विचार धर्माभिमान्यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत
Post a Comment