दि. २९ व ३० मार्च हे दिवस विधानसभेच्या इतिहासात कोकणाला बहुमान* मिळण्याचे ठरले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून निवड झालेले *शिवसेनेचे कोकण पक्षप्रतोद आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी* ह्यांना काल दि. २९ मार्च व आज दि. ३० मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष अनुपस्थित असताना *विधानसभेतील सर्वोच्च स्थान असलेल्या विधानसभाध्यक्ष ह्यांच्या अनुपस्थितीत *तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज चालविण्याची संधी मिळाली. १९९५ साली सर्वप्रथम तात्कालीन विधानसभाध्यक्ष स्व. दत्ताजीराव नलावडे ह्यांच्या रूपाने कोकणाला हा मान मिळाला होता. परंतु कोकणातील फक्त जन्मच नाही तर गेली अनेक वर्षे कोकणातील स्थानिक नेतृत्व असलेल्या व सर्वसामान्यांचे आमदार म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या आमदार राजन साळवींच्या रूपाने प्रथमच कोकणातील स्थानिक आमदार म्हणून ही संपूर्ण कोकणासाठी सुवर्णसंधी ठरली. आपल्या राजकीय अनुभवातून आमदार राजन साळवी ह्यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज चालविताना देखील आपल्या विशिष्ट शैलीत प्रत्येक सदस्याला मान देत सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिली.
Post a Comment