शहरातील एस.टी. बस स्थानकात उन्हाचे चटके बसत असतांना प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र गुडीपाडव्याच्या दिवशी बघावयास मिळाले. मात्र आगार व्यवस्थापकाच्या अशा गलथान कारभारामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
स्थानिक बस स्थानकावरून दररोज अनेक बस गाड्या तालुक्यातील गावांसह अमरावती, वाशिम, नागपुर, जळगाव, औरंगाबाद, शिर्डी, पुणे, अहेरी, चंद्रपुर, वर्धा, यवतमाळकडे आवागमन करीत असल्याने सकाळापासून रात्री उशिरापर्यंत हजारोंच्या संख्येने प्रवासी बस स्थानकावर येतात. यासोबतच गुडीपाडव्याच्या दिवशी तालुक्यातील सावंगा विठोबा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठी यात्रा भरली होती. यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील भावीक भक्त सुध्दा चांदुर रेल्वे बस स्थानकात आले होते. व जादा बसेसची व्यवस्था असल्याने सावंग्याला शहरातुनच गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांसह आबालवृध्द पाण्यासाठी कासाविस झाले होते. चांदूर रेल्वे आगारात सांवगा विठोबा येथील गुडीपाडवा याञेकरीता आलेल्या याञेकरूंना बस स्थानकावर पिण्याचे पाणी मिळाले नाही ही बाब निंदनीय आहे. याञेत मोठ्या प्रमाणात बस सेवा देऊन लाखो रुपयांचे उत्पन्न चांदूर रेल्वे आगर जमा करतो. त्याच याञेकरूंना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते ही बाब चांदूर शहराला गालबोट लावण्यासारखी आहे. या आगारातील व्यास्थापक महिला असुन त्या नव्याने रुजू झाल्या आहे. परंतु वाहक,चालक, सहव्यवस्थापक हे जुने असुनही त्यांना या याञेत किती मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो हे माहीत असायला पाहीजे. यात्रेकरूंना आपली व मुलाबाळांची तहान भागविण्यासाठी बस स्थानक परिसरात असलेल्या कॅन्टीन व दुकानातून पाणी पाऊच व बॉटल विकत घ्यावे लागले. त्यामुळे आगार प्रमुख कॅन्टीनच्या हितास्तव स्थानकात पाण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य असलेल्या परिवहन मंडळाने आपल्या ब्रिदवाक्याचे स्मरण करीत किमान प्रवाशांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकू देऊ ने तसेच आर्थिक भुर्दंड देवू नये अशी मागणी होत आहे. पण अमरावती जिल्ह्यातील कृष्णाजी अवधूत महाराजांची गुडी पाडवा निमित्ताने सांवगा विठोबा या गावात भरणारी याञा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तरीही अशा घटना शहराला कुठेतरी नाव ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते येवढे माञ खरे.
Post a Comment