Thursday, March 30, 2017
पत्रकार अशोक गुंडाळे यांची मराठवाडा सहसचिव पदी निवड - नांदेड येथील अखील भारतीय ग्रामीण पञकार संघाची बैठक संपन्न
Posted by vidarbha on 6:05:00 PM in | Comments : 0
जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -
अखील भारतीय ग्रामीण पञकार संघाची नांदेड येथे घेण्यात आलेल्या नुतन कार्यकारणी बैठकीत महाराष्ट्र राज्य महीला आघाडी पदी सौ.रेखा धुत यांची बिन विरोध निवड करण्यात आली नांदेड येथील शासकिय विश्रामगृह येथे अखील भारतीय ग्रामीण पञकार संघाची नुतन कार्यकारणी बैठक संघाचे केंद्रीय कार्यध्यक्ष श्री.मधुसूदनजी कुल्थे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री कैलासबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.कार्यकारणी बैठकीत मार्गदर्शन करतांना केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसूदन म्हणाले पञकारांनी सामाजिक प्रश्न सोडवीण्यासाठी तत्पर असावे .आधुनिक काळातील पञकार हा अभ्यासु असावा,न्याय व्यवस्थेच्या अभ्यासाकडे पञकारांनी आपले एक कर्तव्य म्हणून पाहावे.कायद्याचे ज्ञान देखील असणे गरजेचे असुन त्या ज्ञानाचा वापर लोकांचे प्रश्न सोडवीण्यासाठी करण्याचे आवाहन केले.बदलत्या काळात पञकारांचे संदर्भ बदललेले आहेत.सोशल मिडीयामुळे नव्या तंञज्ञानामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याचाही अभ्यास पञकारांना असणे गरजेचे आहे ते म्हणाले .तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी एप्रिल महीण्यात जळगाव येथे संघाच्या राज्यस्तरीय अधीवेशन होणार असुन अधीवेशनात जास्तीत जास्त नांदेड येथील पञकारांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या नुतन कार्यकारणी बैठकीत केंद्रीय कार्याध्यक्ष श्री.मधुसूदनजी कुल्थे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री कैलासबापू देशमुख , राजु बिर्ला , डाँ अनील सिरसाट, सौ.रेखा धुत , मकरंद पांगरकर , संदीप महाजन , सौ.चेतना जैन ,बालाजी चल्लावार, संदीप जोगदंड यासह अनेक पञकार व महीला पञकार उपस्थित होत्या. यावेळी वसमत येथील पत्रकार अशोक गुंडाळे यांची मराठवाडा सहसचिव पदी बिनविरोध निवडीबद्दल शाल श्रीफळ व नियुक्ती पञ तसेच ओळख पञ देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले असुन उपस्थितीत असलेल्या सर्वानी त्यांचे अभिनंदन केले .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment