अचलपूर येथे चेडे एटरप्रायजेस ला आग - सावधगिरी व नगरपालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला
Posted by
vidarbha
on
8:19:00 PM
in
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
|
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर परतवाडा रोड वरील तहसिल कार्यालयाजवळील चेडे एटंरप्रायजेस ला दुपारी अचानक
आग लागली.ही आग शाँट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
अचलपूर शहरातील परतवाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक,फर्नीचर व मोबाईल चे भव्य शोरूम चेडेबंधुंचे
आहे तेथेच त्यांचे निवास सुध्दा आहे.स्टीलफर्नीचर च्या वर्कशाँप ला लागून असलेल्या एका बंद गोडावून मधून अचानक धुर निघतांना दिसला तसेच अचलपूर पोलिस स्टेशन व अग्निशामक दलाला सुचित करण्यात आले व ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले व अग्निशामक पथकाच्या तीन गाड्यांनी आगीवर ताबा मिळवला.सावधगिरी व तत्परतेने मोठा अनर्थ टळला कारण या गोडावूनला लागून चेडे यांचे निवास आहे तेथे ए.सी. असून जर आगीने उग्रस्वरूप धारण केले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
आशिष व निलेश चेडे बंधूंनी सांगितल्याप्रमाणे दुरुस्ती च्या गँसशेगड्या व ईतर साहित्य आगीत सापडले आर्थिक नुकसान नेमके किती झाले याचा सध्या तपशील प्राप्त झाला नाही तसेच आगिचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शाँटसर्कीटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवता जात आहे.पुढील तपास अचलपूर पोलीस स्टेशन करित आहे.आगीची वार्ता शहरात पसरताच असंख्य नागरीकांनी धाव घेतली तसेच नगरसेवक नरेंद्र फीसके,छायाताई भागवत, हरिश्चंद्र मुगल,माणिक देशपांडे,गजानन बिजागरे व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शांतता प्रस्थापित केली.
Post a Comment