प्राप्तमाहितीनुसार, चांदुर रेल्वे वरून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम दिलावरपुर येथील राजश्री विनोद वाकडे (वय १५ वर्ष ) ही शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता गावातीलच विहिरीवर पाणी भरायला गेली होती. मात्र पाणी भरतांना राजश्रीचा पाय घसरून ती विहिरीत पडली. या घटनेत राजश्रीचा करुण अंत झाला. दुपारी स्थानिक ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
सदर बालीका ही स्थानिक जिल्हा परीषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती. व सकाळची शाळा असल्यामुळे ती पहाटेच उठली होती. राजश्रीला आई, वडील,१ भाऊ व १ बहिण आहे. तिच्या अचानक मृत्युमुळे कुटुंबासह गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment