चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
सद्या लहान मुले- मुली शालेय परीक्षांच्या तनावातुन मुक्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या हक्कांच्या या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांकरीता धमाल मस्ती सोबतच व्यक्तीमत्व विकास घडवुन आणणारे तसेच मुलांमुलींकरीता हक्काचे व्यासपिठ उपलब्ध करून देणारे 'मस्ती की पाठशाला' या शिबीराची उद्या १ मे पासुन सुरूवात होत आहे.
पंधरा दिवशीय शिबीराचे आयोजन स्थानिक साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला कॉलेजच्या बाजुला असलेले हुतात्मा स्मारक येथे करण्यात येणार आहे. या शिबीराची पेटी, तबला, गिटार, डफडी, बासरी, खंजेरी, टाळ, मृदुंग, स्टेज डेरींग, नाटक, नृत्य, गीत गायन, माईम, स्कीट, योगा, कराटे, हस्तकला, चित्रकला, मेहंदी, मातीकाम आदीं वैशिष्टे आहेत. शिबीरामध्ये सुनिल इंगळकर (फिल्म डायरेक्टर), हर्षद ससाने (अभिनेता, नाट्य दिग्दर्शक), दिपक बनसोड (नाट्य दिग्दर्शक), उज्वल पंडेकर (मातीकाम व नक्षीकाम), गायकवाड सर (चित्रकला), राहुल जगताप (लेखक), दामले सर (इंग्लीश स्पीकींग), अमोल राजनेकर, आकाश वानखडे (तबला वादक), राहुल डोंगरे, संजुभाऊ (पेटी बासरी, खंजेरी वादक), राजेश डोंगरे (डफळी वादक), भानुदास टाके (मृदुंग व टाळ वादक), सौ. कविता भोले (हस्तकला), सचिन उईके (हिपहॉप डान्स), अजित आजनकर (ढोलकी वादक), प्रज्ञा तायडे (लावणी), प्रतिक्षा पोकळे (भरत नाट्यम), काजल धवने (मराठी नृत्य), अंकीता होले (मेहंदी काम व रांगोळी), मिश्रा सर, सौ. स्नेहा चंदाराणा व अमोल ठाकरे (योगा), नितीन आरेकर (पशु मार्गदर्शक), संदिप देशमुख (कराटे), निशा कांबळे (गायण) आदीं तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे.
सदर शिबीराकरीता गोपी शिरभाते, वैभव पाटणे, सुरज भोयर, अनिकेत सयाम, अभिनव घोंगडे, निरज धुर्वे, मयुर शिदोडकर, कुलदिप तायडे, निखिल राऊत, अमित वानखडे, भुषण चक्रे, कौस्तुभ देशमुख, पवन वाघ, तेजस लहाने, संजना गाडेकर, इशिका मेश्राम, क्षितीजा वऱ्हाडे, सुचिता खोब्रागडे, अनिशा भगत, संजना दुधे, धनश्री धोटे, वैष्णवी मेटे, आचल खोल्हापुरे, अश्विनी गायगोले, सोनाली चतुर आदी अथक परीश्रम घेत आहे. शिबीराचे संचालक चेतन भोले व सचिन उईके असुन आपल्या पाल्यांचा प्रवेश लवकर निश्चित करण्याचे आवाहन संचालकांनी पालकांना केले आहे.
Sunday, April 30, 2017
उद्यापासुन शहरात 'मस्ती की पाठशाला' साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन
Posted by vidarbha on 1:00:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment