नाशिक :-
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment